मी
रोम रोम पेटतो पण काया होते बंदिनी
आर्त मन हे साद देई पाय गेले जखडूनी
कोण घाली बंधने मज, का अशी कमजोर मी
वागले जर मुक्त मग का भासते मज स्वैर मी
तो म्हणे अन ती म्हणे हे खेळ मनचे वाहूनी
मीच कारावास रचला, कैद ही झालेच मी
घे भरारी ग नभी बेड्या मनीच्या तोडूनी
मुक्त हो स्वच्छंद हो निर्बध सारे झटकूनी
मोल स्वत्वाचे कळावे, घ्यावे मज मी व्यापूनी
लख्ख प्रतिमा ही पाहावी आज व्हावे मीच मी
आज व्हावे मीच मी....
रोम रोम पेटतो पण काया होते बंदिनी
आर्त मन हे साद देई पाय गेले जखडूनी
कोण घाली बंधने मज, का अशी कमजोर मी
वागले जर मुक्त मग का भासते मज स्वैर मी
तो म्हणे अन ती म्हणे हे खेळ मनचे वाहूनी
मीच कारावास रचला, कैद ही झालेच मी
घे भरारी ग नभी बेड्या मनीच्या तोडूनी
मुक्त हो स्वच्छंद हो निर्बध सारे झटकूनी
मोल स्वत्वाचे कळावे, घ्यावे मज मी व्यापूनी
लख्ख प्रतिमा ही पाहावी आज व्हावे मीच मी
आज व्हावे मीच मी....
No comments:
Post a Comment