आज वाईच उशिरच झाला व्हता उटाया, पोरं अजूनबी झोपलीच व्हती. पप्पू रातच्याला उशिरा आलाता कामावरनं, तिथंच अभ्यास करायचा, घरी एवढ्या पोरातनं कुटुन वेळ मिळाया वाचाया. लखन तर अजून लहान व्हता, साळंला जायचा नि परतून आजीकडं जाऊन बसायचा आईची वाट बघत. म्हातारीचा जीव होता पोरांवर. सुनितालाबी पोरीसारखी बघायची. गीता नुकतीच मोठी झालीती, सुनिता तिला आपल्यासंगट कामावर न्यायची, इथं झोपडपट्टीत कुणी काय आगळीक केली तर? लय भ्या वाटायचं सुनिताला, त्यात पोर देखणी, रुपानं सुनितावर गेलंती, पण रंग उजळ होता. साळंत जायची, पन आता ते बी बंद झालंतं, आई बरोबर कामाला गेलं की नजरेसमूर रहायची नि काम बी हलकं व्हायची, हल्ली २-३ घरची कामं पोरगी एकट्याच्यानं करायची. सुनितानं एकदा तिच्यावरनं बोटं मोडली, "देवा चांगल्या घरात पडू दे रे पोर" म्हणत उठून मोरीतल्या पाण्यानं त्वांड खांगाळलं आन रिकामा हंडा घेऊन ती घराबाहेर पडली.
बाहेर सकाळची लग्बग सुरू झालीच व्हती, आठ-धा बाया नळावर आल्यात्या, पाणी भरता भरता तुजं कसं, माजं कसं चाललंतं, पाण्याला शेजारची रेखाबी आलती. पोरीची हळद बी उतरायची व्हती अजून तर घरच्या कामाचा सगळा बोजवारा डोक्यावर घेतलाता तिनं. सासू लय गुणगान करायची. तिला बगून सुनिताला तिच्या नवलाईच्या दिवसाची आठवण व्ह्यायची. सुनिता सावळी होती, पन चार-चौघीत उठून दिसायची नि कामाला वाघ. गंगाक्कानं आपल्या पोरासाठी तिला एका लग्नात हेरलंतं. रंगा रिक्षा चालवायचा, उत्पन्न बरं होतं. पोरगा विशीला आलाता, तवा सोयरीक जुळवायला हवीच होती. गंगाक्कानं सुनिताला मागणी घातली नि आठव्या दिवशी सुनिता सून बनून ह्या घरात आली. घरात सासू, सासरा नि रंगा. एक दीर व्हता, त्यानं वेगळा घरोबा केलेला, दोन घरं सोडून रहायचा. झोपडपट्टी असली तरी घरं विटांची होती. घरात मोरी-संडास होते. रंगा चार पैसं राखून व्हता. लई सुखाचं दिस हुतं. पहिल्या दोन सालातच पप्पू नि पाठून गीता झाली. संसाराला हातभार लावाया म्हनून सुनिताबी कामावं जाया लागली. सगळं सुरळीत व्हता व्हता काय कुनाची दृष्ट लागली काय बा, रंगाला दारूचं व्यसन जडलं. पहिल्या पहिल्या गम्मत म्हनून पितोय म्हनायचा, हफ़्त्यातनं एखाद दिवस प्यायचा. सुनिताबी म्हनली असू द्या. रिक्षावाल्यांबरोबर जातोय, चार लोकात त्यांच्यासारखं वागावं लागतंय आनि त्याला पन बरं वाटतंय. पन हळूहळू पिणं रोजचं व्हाया लागलं. सुनिताबी गप्प बसणारी व्हती व्हय, रंगा आला की रोजची भांडाभांडी व्हायची.
एक दिवस रंगा घरी आला, येताना मटण घेऊन आलता. पोरांना कापडं, सुनितासाठी डोरलं. सुनिता खुश झाली, म्हनली देव पावला. धन्याला अक्कल गावली. पन असं व्हाया नशिब पाहिजे की. रंगा रिक्षा इकून आलता. सुनिताला काय उमजंचना. सासूबी रडाया लागली. पोरं बावचळली. सुनितानं रंगावर लई त्वांड सोडलं. त्यादिवशी पहिल्यांदा रंगानं सुनितावर हात उचलला. सासू मध्ये पडली तर तिलाबी ढकलून दिलं. म्हनला तुला माझं सुख बघवत न्हाई. मित्रांबरोबर धंदा काढतोय म्हनला. चिडून घराबाहेर पडला नि घरी आला ते झोकांड्या खातच.
मित्र कसले टवळे मेले. ह्याच्या पैशानं रोज दारू-मटण ढोसायचे. रोज नवीन धंद्याच्या गोष्टी करायचे. रंगा मात्र रोज श्रीमंतीची स्वप्नं रंगवत झोपायचा. चार ठिकाणी पैसं बी दिलं कुठं कुठं गुंतवाया. पन परतून कायच मिळंना. रंगा पैसं मागाया लागला तसं एकेकाचं येणं बी कमी व्हाया लागलं. रंगा एकटा पडला. सगळा राग बायका-पोरांवर काढाया लागला. त्यातच सुनिताला पुन्हा दिवस गेले. तर पोर माझं नाही म्हणाला. त्या दिवशी मात्र सासूनं केरसुणीनं झोडपला त्याला. माज्या सुनंला कायबाय बोललास तर हाकलून काढते म्हनली. रातभर सुनिता रडत व्हती. पण त्या दिवसापासून तिनं रंगा सुधरायची आस सोडलीच. आपल्या पोरांसाठी आपनच कंबर कसायची असं ठरवून टाकलं.
रोज रंगाच्या हातावर पाच रुपे ठेवायची. तो बी कुटं कुटं जाऊन दारू घेऊन यायचा. त्याच्या नावची भाकर नि भाजी सुनिता काढून ठेवायची बाजूला. कधीमधी गोडधोड करायची तर ते बी ठेवायची. पन बोलणं टाकलं ते टाकलंच. सासू लई समजवायची, प्रेमानं वाग म्हनजे सुधरंल म्हनायची. पन सुनिताला त्याला बघितलं की तोच दिवस आठवायचा. माज्या नशिबात एवढाच संसार आहे म्हनायची. गळ्यात डोरलं हाय नि कपाळावर कुक्कू हाय म्हनून हा दादला म्हनायची. कितीतरी वर्ष असाच संसार केला दोघानी. नि एक दिवस तो बी उधळला गेला.. दारुनं एक जीव आणखी घेतला. चार दिस सगळे रडले नि परत कामाला लागले. पोट भरायचं तर राबायला हवं. सुनिताबी राबली, धुणी-भांडी केली, दिस-रात काम केलं, पन कुणाम्होरं हात न्हाई पसरलं.
"ए सुने हंडा भरला की" रंजीच्या हाळीनं तंद्री मोडली सुनिताची. लगबगीनं पाणी घेऊन ती घरी परतली. पोरं उठलीच व्हती. धाकल्याला आजीकडं धाडून ती गीतासंगट बाहेर पडली, आज पहिलं काम सिंध्याचं कराया पायजे, नाईतर भाभी बोल लावंल असा ईचार करत सुनिता बिगीबीगी चालायाही लागली.
आणखी एक दिवस सुरु झाला..