Tuesday, June 16, 2009

आई झाल्याची लक्षणे

तुमच्या मते तुमचे बाळ जगातले सगळ्यात cute बाळ असते
तुमच्या मते तुमचे बाळ खूप हुशार असते, त्याला तुम्ही बोललेले सगळे काही समजते आणि ते तुम्हाला प्रतिसाद ही देते.
तुम्ही मैत्रिणींबरोबर फक्त बाळाबद्दल बोलता, अगदी त्याच्या शी-शू पासून, जो-जो आणि मम्म, सगळ्याबद्दल तितक्याच आत्मियतेने चर्चा करता. (हळू हळू तुमच्या मैत्रिणींचे फोन येणेही कमी होऊ लागते)
तुमचे बाळ इतर कुणाशीही खेळायला लागले (त्याचा बाबा included) की तुम्हाला त्या व्यक्तीचा मत्सर वाटतो.
बाळाने कितीही त्रास दिला तरी तुम्ही त्याचीच बाजू घेता, त्याला बरे वाटत नसते किंवा झोप येत असते म्हणून ते असे वागते असे तुमचे ठाम मत असते.
तुमच्या बाळाच्या बरोबरीच्या मुलांपेक्षा तुमचे बाळ नेहमीच पुढे असते. त्याची प्रगती इतरांपेक्षा नेहमीच fast होते.
तुम्ही घरी फोन केला की विनाकारण फोन speaker mode वर ठेऊन बाळाच्या आजी-आजोबा, मामा-मामी, काका-काकू आणि इतर सर्व नातेवाईकांना आवाज ऐकवता आणि बाळ किती छान बोलते आणि काय काय नवीन गोष्टी करते ह्यावर चर्चा करण्यातच तुमचा सगळा वेळ जातो.
तुम्ही पुन्हा पुन्हा बाळाचे फोटो आणि व्हिडिओ बघता आणि दरवेळी तुम्हाला नव्याने ह्या गोष्टी पाहिल्याचा आनंद होत असतो.

ही आणि अशी बरीच लक्षणे आहेत... कधी अनुभवले आहे तुम्ही हे?

Monday, June 08, 2009

पुनरागमन

किती तरी दिवस झाले इथे येऊन, मध्ये एकदा नंदनचा प्रतिसाद वाचला आणि जाणवले खरेच किती तरी वर्षं झाली आपण काही लिहिलेच नाही. आयुष्यात इतक्या गोष्टी घडत होत्या की मला स्वतःसाठी पण वेळ मिळत नव्हता, लेखन वगैरे खूप दूरची गोष्ट आहे.

काही दिवसांपूर्वी आम्ही दोनाचे तीन झालॊ, बघता बघता माझे पिल्लु साडे नऊ महिन्याचे झालेदेखील. त्याच्या बाळलीलांपुढे दुसरं काही सुचतच नव्हते. असो, you will see more of me now onwards. भेटूच..