जाऊ नको ना
जाऊ नको ना साथ सोडूनी, अर्धी वाट ही नाही सरली
जपण्यासाठी आठवणींची, ओंजळ अजूनही नाही भरली
हातामध्ये हात घेउनी, चालत होतो सोनकिनारी
वाळूमधली पाऊलांची ती, रांगोळीही नाही पुसली
जाऊ नको ना.....
क्षणात आहे क्षणात नाही, क्षणात आटली जीवनधारा
क्षणाक्षणाला भास तुझा, एक क्षणाचा खेळ हा सारा
क्षणभंगुर त्या भातुकलीचा, गेला मोडूनी डाव नियारा
पुन्हा मांडूया तीच चूल अन, अंगत पंगत तोच पसारा
जाऊ नको ना......
आठवते मज आज पुन्हा ते, वेडे भांडण पावसातले
ओल्या मातीच्या गंधाने, भिजवून गेले चुंबन पहिले
गंध तोच अन कोसळणारा, तोच असे रे पाऊस ओला
ये ना घे ना कवेत फिरुनी, घाबरा होई जीव एकला
जाऊ नको ना.... ऐक ना रे.. जाऊ नको ना....