Friday, April 28, 2006

आरक्षण...कशासाठी?

मी अमेरिकेत आले तेव्हाच ठरवलं होतं, आपण आपल्या देशात परत जायचं. अजूनही विचार पक्का आहे, पण मग अशा काही बातम्या वाचल्या की वाटतं आपला निर्णय चुकीचा तर ठरणार नाही ना? "ब्राम्हणद्वेष" जिथे एखाद्या धर्माचा पाया असू शकतो अशा देशात मी ब्राम्हण म्हणून जन्मले. मी शाळेत असताना अधूनमधून "बामण" म्हणून चिडवाचिडवी व्हायची, पण त्याचा त्रास व्हावा इतक्या प्रमाणात नाही. पण उद्या माझ्या मुलाबाळांना "ब्राम्हण" म्हणून वाईट वागणूक मिळणार नाही ह्याची खात्री देऊ शकतं कुणी? नाही.. त्यांना equal opportunities मिळतील ह्याची खात्री आहे? नाही... त्यांच्यावर जातीच्या राजकारणामुळे अन्याय होणार नाही ह्याची खात्री आहे? नाही.. किंबहुना तसा अन्याय होण्याचीच शक्यता जास्त आहे. मग मी आणि माझ्यासारख्या हजारो उच्चवर्णीय अनिवासी भारतीयांनी परत जाण्याचा निर्णय बदलायचा की काय?
माझा विरोध आरक्षणाला नाही. पण जातीच्या राजकारणाला नक्कीच आहे. द्या ना आरक्षण, पण गरिबांना द्या, गरजूंना द्या. त्यांची जात नका बघू. कुवत बघा. आज गरीब उच्चवर्णिय विद्यार्थ्याजवळ काय पर्याय आहेत?
१) आपल्या पालकांना कर्ज काढायला लावून एखाद्या private college मध्ये जाऊन शिकायचं, शिक्षण पूर्ण झालं की नोकरीसाठी पुन्हा टाचा घासायच्या आणि त्यातून निष्पन्न काय होणार, तर त्याची जागा एखाद्या SC/ST/BC/OBC उमेदवाराला मिळेल.
२) आपली कुवत असूनही उच्च शिक्षणाला राम-राम ठोकायचा आणि गरिबीच्या गर्तेत खोल-खोल बुडत जायचं.

आज आपण मारे आरडा-ओरडा करतो आहे "India Shining" चा. पण प्रत्येक क्षेत्रात reservations झाले, तर राहील हीच परिस्थिती? Will we be able to maintain quality of work we promise today? मग कोण गुंतवेल पैसा भारतात? काय परिणाम होईल ह्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर? प्रश्न बरेच आहेत.. पण उत्तर शोधण्याचा प्रयत्नसुद्धा करणार नाहीत आपले राजकारणी लोक. कारण त्यांना vote bank मिळवायच्या आहेत आणि त्यासाठी जातीच्या राजकारणापेक्षा सोपा मार्ग तो कुठला? "Divide and Rule" ची नीती आणखी किती दिवस चालवणार हे लोक? देशाच्या ठिक~या केल्याशिवाय स्वस्थता मिळणार नाही बहुदा ह्यांना. आपण कितीही आरडाओरडा केला तरी हे लोक आपलं मन मानेल तेच करणार. चूक आपलीच आहे म्हणा, आपणच तर दिलाय माकडांच्या हातात कोलीत मतं देऊन.

चला... आपण ह्या सगळ्याकडं कानाडोळा करायला शिकू या. चांगलं ते घेऊन वाईट सोडून देऊ या... चला, सगळे एकसाथ म्हणा बघू "माझा भारत महान!!!!"

6 comments:

दिलीप कुलकर्णी said...

धन्यवाद, एका गंभीर विषयाला वाचा फोडलीत, त्याबाबत.
आरक्षणचा मुद्दा करुन फक्त ह्यांना आपली पोळी भाजुन घ्यायची आहे. फक्त उच्चवर्णीय असल्यामुळेच ह्याची मला चांगलीच झळ बसलेली आहे. जातीयवाद मी ही मानत नाही पण जे भोगावे लागले, त्यात माझी फक्त चुक एवढीच ब्राम्हण म्हणुन जन्माला आलो.
माझ्या शाळेतल्या दिवसांचा एक अनुभव. त्यांनी ब्राम्हणाच्या पोराला 'बामणा' म्हंटले तर काही हरकत नाही. तो गुन्हा ठरू शकत नाही. पण ह्यांना ह्यांच्या जाती बद्दल बोलले की, बापरे बाप, तो महाभंयकर गुन्हा सिद्द होणे कठीण नाही.
सरळ सोपा हिशोब बघा. त्याना फी माफ, गुण कमी पडले तरी चांगल्या अभ्यास क्रमाला प्रवेश राखीव. तिथेही वस्तीगृह, अनुदान व इतर सोयी सवलती दासी सारख्या उभ्या. माझ्या वेळेस अभियांत्रीकीचा प्रवेश खुल्या वर्गात खुल्या वर्गासाठी ९३% ला बंद तर तर त्याना ५६.२ % ला प्रवेश. जर ९५% वाला अभियंता व ५६.२% अभियंता, भले दुस~याने ४ वर्षाचा अभ्यासक्रम १० वर्षात का पुर्ण करेना, काय चिंता, नौकरीतही आरक्षण आहेच ना. बरे वय ज्यास्त झाले तर काय बिघडते. वयाची अटही शिथील आहेच ना. वरुन नौकरीत बढती मध्ये ही प्राधान्य. सगळा आनंदी आनंद. बरे कामाची गुणवत्ता व बौद्धीक क्षमता बाबत विचारायची सोयच नाही. विचारलेच तर......तुम्ही जातियवादी.
मला तर वाटते आपल्या शासनाने इतर देशांना अधिकृत पत्र पाठवुन, तिथेही आमच्या ह्या लोकांना आरक्षण देण्याची विनंती करावी. म्हणजे भारताची दलीत कैवारी म्हणुन सगळ्या जगात प्रतिमा उजळेल.

Priyabhashini said...

I m Brahmin too...but tell me something...when "these people" were denied education, jobs, social positions and so on for hundreds of years...Were they complaining same way?

Tsk! Tsk! Probably not...Coz they didnt know how to write.

दिलीप कुलकर्णी said...

Thanks for you comment. Your question itself has a answer of the same.
What will happen when our children or grand children will ask the same question to us? What answer we have to give them?
We are not opposing to RESERVATION, but it should not be based on caste.
What we will achieve this way? Nothing else, just we are dividing the whole community.
What is the result of reservtions since it started? How many people from reservation category holding top most or highly responsible post in various field.
Till this time government could not find the right candidates from reserve category and lot positions till vacant because of just the Quota system.
Could any one justify that?

Anonymous said...

It was so nice.I agree with u i.e. reservation on basis of INCOME ONLY STRICTLY. U r 1 out of country & FEAR to come back its very shameful u can't clean d INDIA, u don't have a guts to do so. Thats why i hate those person.Dont make only comments on ISSUE of reservation, u dont know how many class present here .In u r blogger u have meintoined SC/ST/BC/OBC. what is 'BC'?,if u dont know name of the catogery then have u right to oppose them?
Ok no problem u had wrote उच्चवर्णीय अनिवासी भारतीयांनी . If u r उच्चवर्णीय then come back on u r talent , change system , make entry in Politics change all the things, माकडांच्या this is very shameful thig that u r using such dirtry low level words yet u r उच्चवर्णीय.

Please mail me on rharkal@yahoo.com

SANJAY SURPURIYA said...

AARAKSHA KASHYA SATHI? ?
AARAKSHAN FAKT RAJAKARANASATHI.

Anonymous said...

आपले विचार वाचले. आपला विरोध आरक्षणाला नाही तर जातीय आरक्षणाला विरोध आहे हे वाचल्यावर काही प्रश्न निर्माण झाले. त्यांची उत्तरे तुमच्याकडून अपेक्षित आहेत.

१. सध्याच्या आरक्षण पध्द्तीत दोष काय आहेत? आर्थिकदृष्ट्या आरक्षण दिले तर त्यात हे दोष नसतील का?

२. आर्थिकदृष्ट्या गरीबांमध्ये दोन प्रकार आहेत.
अ. आर्थिकदृष्ट्या गरीब.
ब. सामाजीक, सांकृतीक, वैचारीक/मानसीक आणि आर्थिकदृष्ट्या गरीब.

अ गटातील गरीबांना शिक्षणाचे महत्व कळलेले असते. त्यांचा समाज, त्यांची सामाजीक, वैचारीक बैठक या गोंष्टीना त्यांच्या विकासात महत्वाचे स्थान असते.

ब गटातील गरीबांना शिक्षण म्हणजे काय? आणि शिकून काय होते? इथपासून सुरूवात करावी लागते. त्यांची सामाजीक, वैचारीक बैठक.......म्हणजे काय???

मानसशास्त्रज्ञांनी स्पष्त केलेले आहे की "गुणवत्ता आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. जसजशी परिस्थिती अनुकूल होत जाते तसतसा IQ वाढत जातो."

गुणवत्तेवरील लेख इथे वाचा http://www.loksatta.com/daily/20060519/vishesh.htm

सामाजीक / सांस्कृतीकदृष्ट्या पुढारलेल्या समाजात एकमेकांमधील नाते संबंधामुळे (लग्न ई.) इतर घटकांना पुढे येण्यास समाज अप्रत्यक्षपणे बरीच मदत करत असतो

अशा वेळेस आर्थिकदृष्ट्या आरक्षण कितपत योग्य ठरेल?

२. दोन भिन्न परिस्थितून आलेल्यांची गुणवत्ता कशी मोजणार?

३. जातीय आरक्षण देवून ज्या जाती अजूनही काळाच्या मागे आहेत त्या आर्थिकदृष्ट्या आरक्षण पध्दतीमूळे पुढे कशा येतील?(डोंबारी, कैकाडी, वडारी...या व अशा)

४. आरक्षण सोडून इतर काही पर्याय आहे का?